शेतकऱ्यांच्या शेतातील विज पुरवठा खंडीत केल्यास किसान सेना उपोषण करणार -NNL

किसान सेना तालुका प्रमुख प्रकाश जाधव यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्‍यात निसर्गाच्या अवकृपेमुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पिके हि गेल्यामुळे खरिपात शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीची पिके घेत आहे. मात्र महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडण्याची भाषा करत आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडीत करू नका अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे.

यंदाच्या वर्षातील खरीप हंगामात झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांची पिके चिबडुन, पाण्यांने वाहुन अतिशय नुकसान झालेले आहे. त्याबाबत शासनाकडुन शेतकऱ्यांना आर्थीक मदत अतिवृष्टीची जाहिर केलेली आहे. शेतकऱ्यांचा खरिंप हंगाम पुर्णत: गेल्याने शेतकर्‍यांनी कसाबसा आपल्या शेताची मशागत करुन रब्बी हंगामाची तयारी केली व.रव्बीची-पेरणी शेतकर्‍यानी शेतामध्ये हरभरा, गहू, करंडी वगैरे पिकांची पेरणी केली आहे.


परंतु आपल्या महावितरण कडुन शेतकऱ्यांच्या शेतातील विज पुरवठा खंडीत॑ करण्यांत येणार-असल्याचे सांगितले जात आहे. त्याकरीता आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करण्यांत येत आहे की, शेतकरी अगोदरच अस्मानी संकटाला तोंड देत असल्यामुळे कशीबशी रब्बीची पेरणी पुढच्या आशेने केलेली. असल्यासुळे त्यांच्या शेतातील.विज पुरवठा खंडीत करण्यांत येवु नये अशी विनंती निवेदन देऊन केली आहे. 

जर आपल्याकडून शेतकऱ्यांच्या शेतातील विजपुरवठा खंडीत केल्यास लोकशाही मार्गाचा अवलब करुन तालुकयातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवुन शिवसेना किसान सेनेच्या वतीने आपल्या उपविभागीय कार्यालय, हिमायतनगर समोर अमरण उपोषण करण्यांत येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या महावितरण कार्यलेयावर राहिल असा इशाराही निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय भोकर, तहसीलदार हिमायतनगर, पोलीस निरीक्षक हिमायतनगर याना देण्यात आले आहे. या निवेदनावर रामभाऊ ठाकरे, तालुका प्रमुख, सत्यवृत्त ढोले, आदिवासी तालुका प्रमुख, प्रकाश उदाजी जाधव, किसान सेना तालुका प्रमुख, कपिल हराळे पाटिल, उपतालुका प्रमुख, शंकर चेलमेलवार, उपतालुका प्रमुख किसान सेना आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी