बेसिक्स ऑफ ऑइल कलर' कार्यशाळा उत्साहात -NNL

ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून आयोजन


पुणे|
ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून १९ नोव्हेंबर रोजी 'बेसिक्स ऑफ ऑइल कलर'  ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा  पूर्ण दिवसभर उपासना मंदिर,ज्ञान प्रबोधिनी,सदाशिव पेठ येथे पार पडली.  

सुप्रसिद्ध युवा चित्रकार स्नेहल पागे यांनी मार्गदर्शन केले.पागे यांनी ऑइल कलर पेंटिंग ची प्राथमिक आणि मूलभूत कौशल्ये शिकवली.ऑईल कलर, लिन्सीड ऑईल, वॉर्निश, टर्पेटाईन, लागणारे ब्रश  या गोष्टींची तसेच  लेयरिंग आदी तंत्रांची माहिती दिली. विविध प्रात्यक्षिके दाखवली. कलाप्रेमींसाठी ही  कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कला गटाच्या वतीने शिवाली वायचळ व मिलिंद संत यांनी स्वागत केले. रविवार, २०नोव्हेंबर रोजी दिवसभर या कार्यशाळेचा पुढील भाग होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी