नावामनपाची शहरबसेवा तात्काळ सुरू करा, सिडको शिवसेना ठाकरे गटाची मागणी -NNL


नवीन नांदेड।
नांदेड शहर वाघाळा महानगरपालीकेची सिटी बस सेवा अनेक वर्षापासून बंद पडली असून तात्काळ सुरू करावी आशी मागणी शिवसेना ठाकरे सिडको गटाचा वतीने ऊपशहर प्रमुख प्रमोद मैड व पदाधिकारी यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांचा कडे निवेदनाद्वारे केली आहे .

नांदेड वाघाळा महानगरपालीकेने गेल्या अनेक वर्षांपासून दैनंदिन शहर बस सेवा सुरू होती,  पंरतु गेल्या तीन वर्षापासून कोरोणा काळात हि पुर्ण पणे सार्वजनिक दळणवळणाच्या मुलभूत सुविधेला बंद करुन मागच्या अनेक वर्षापासून नागरिकांचे जाणिवपूर्वक हाल करत आहेत. दवाखाना, बस बसस्थानक, रेल्वेस्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व अनेक महत्वाच्या ठिकाणी नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्याच बरोबर शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी नोकरीला जाणारे कर्मचारी यांना या गैरसायीमुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास या गोष्टीसाठी महानगरपालीका व प्रशासन व शासन जबाबदार असेल ,आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी.

शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता घरातून बाहेर पडणारी व्यक्ती खासगी परिवहन व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकत नाही. महापालीकची  शहर सिटी बस सेवा हा नागरिकांचा विश्वास होता न घाबरता प्रवास करता यावा. या उद्देशाने सुरु केलेली ही बस सेवा जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी लवकरात लवकर सुरु करुन नांदेड वाघाळा महानगरपालीकेच्या नागरिकांना प्रवासाची मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी  ऊपशहर प्रमुख प्रमोद मैड,कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे, माजी शहर प्रमुख साहेबराव मामीलवाड,ऊपशहर प्रमुख जितुसिंग टाक, पप्पू गायकवाड, महिला आघाडीच्या निकिता शहपुरवाड, संदीप जिल्हेवाड, विष्णु कदम, संजय साबणे, यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी