आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसोबत भाऊबीज साजरी -NNL


अर्धापूर।
येथे नाम फाउंडेशनच्या वतीने भाऊबीज साजरी करण्यात आली, यावेळी महिलांना साडीचोळी,मिठाई,फराळ देण्यात आला.

शहरातील पंचायत समितीच्या डॉ शंकरराव चव्हाण सभागृहात नाम फाउंडेशनच्या वतीने भाऊबीजेचे आयोजन करण्यात आले,यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, गटविकास अधिकारी मिना रावताळे, नायब तहसीलदार मारोती जगताप सुनिल माचेवाड, कार्यालयीन अधिक्षक आर.टी. सातव,  विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर,डॉ  एस. पी‌ गोखले, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राम शिंदे यांची उपस्थिती होती.

नाम फाऊंडेशनचे तालुका समन्वयक लक्ष्मीकांत मुळे‌ यांनी प्रास्ताविक करुन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात ‌आलेल्या विविध कामांची व उपक्रमांची माहिती दिली, यावेळी अधीकारी यांनी मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळाव्यास कोंढा,देळुब धामदरी मालेगाव नांदला दिग्रस अर्धापूर येथील शेतकरी कुटुंबातील महिला,पाल्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार गुणवंत विरकर यांनी मानले.यावेळी गीते, शेख साबेर,आनंद मोरे, सुरेश वळसे,रुपेश कदम,अंबादास वारुळे,आरेफ,शकील,श्रीमती कदम,इबीतवार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी