पैशाची मागणी करत विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करणाऱ्यांच्या विरोधात भोकर पोलीसात गुन्ह्यांची नोंद -NNL


भोकर, गंगाधर पडवळे।
घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर मी दुसरे लग्न करीन असे म्हणत आपल्या पत्नीला मारहाण करून मानसिक त्रास देणाऱ्या पती,
 मुलाची आई, ननंद,नंदवई, विरोधात भोकर पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

फरिन नाज पति शाहरुख कुरेशी वय २२ व्यवसाय घरकाम रा.भोई गल्ली जुना लोहा ह.मु  सईद नगर भोकर हिचा विवाह रितिरवाजा प्रमाणे लोहा येथील शाहरुख पिता गफूर कुरेशी यांच्यासोबत दिनांक ०५/०४ / २०१९ रोजी एक लाख रुपये हुंडा, १५ ग्रॅम सोन्याचे दागिने, चार लाख रुपयाचे गृह उपयोगी साहित्य व लग्नासाठी तीन लाख असा एकूण खर्च आठ लाख पन्नास हजार रुपये माझ्या लग्नावर  भावाने खर्च केला आहे असे सदरील तक्रारदार महिलेने जबाबात नोंदविले आहे.

लग्नाच्या १५ते २० दिवस माझ्या सोबत चांगले वागून नंतर मात्र माझे सासऱ्याच्या लोकांनी तुझ्या लग्नात आमची व्यवस्था  चांगली  केली नाही असे म्हणत सासरचे लोक टोचून बोलू लागले व मला  मारहाण करत,मानसिक त्रास देत होते माझा नवरा शाहरुख गफूर कुरेशी हा मला माहेरहून घर बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये  घेऊन ये म्हणून मारहान करू लागला व  तू मला आधीच पसंत नाहीस मी दुसरी बायको करतो ते मला पाच लाख रुपये द्यायला तयार आहेत असे म्हणून घाण घाण शिव्या देऊन थापड,बुक्क्याने मारहाण करीत असत व माझी सासू रुकसाना माझ्या पतीला  माझ्याविरुद्ध काहीही लावून सांगून त्याला माझ्या विरुद्ध भडकवत असे  मला तू चांगली वागत नाहीस मी माझ्या मुलासाठी दुसरी बायको आणतो म्हणून मला नेहमीच शिव्या देत असे.

 त्याच बरोबर माझी नणंद सलमा व तिचा पती सलीम कुरेशी हे माझ्या घराच्या बाजूलाच राहतात ते माझ्या घरात येऊन माझ्या पतीला व माझ्या सासूला माझ्या विरोधात लावून देऊन या सर्वांनी मिळून मला शारीरिक मानसिक त्रास देत सासरहून मला माहेरी १५/ १२/ २०२१ रोजी दुपारी दोनच्या सुमारास लोहा येथून जबरदस्तीने पाठवले. त्यावेळी मी गरोदर असताना मला त्रास देऊन घरातून हाकलून दिले. जेव्हा मला मुलगा झाला त्यास पाहण्यास माझ्या माहेरी माझा नवरा व इतर नातेवाईक हे भोकर येथील माझ्या भावाच्या घरी आले तेंव्हा माझा नवऱ्याने आमच्या बाळाला पाहून म्हणाला की हा माझा मुलगा नाही? कुणाचा आहे.

अशा प्रकारे माझ्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून माझ्या माहेरी भांडण करून निघून गेले मी अनेकदा फोन करून माझ्या पतीला व सासू-सासर्‍यांना बोलण्याचा प्रयत्न केला पण ते मला काही उत्तर देत नव्हते व काही बोलत नव्हते माझा पती शाहरुख पिता गफूर कुरेशी, सासू रुकसाना बेगम, ननंद सलमा व तिचा नवरा सलीम सर्व रा.भोई गल्ली जुना लोहा जिल्हा नांदेड या चौघांनी मिळून मानसिक व शारीरिक छळ करून शिवीगाळ करीत थापड, बुक्यानी मारून जीवे मारण्याची धमक्या देऊन उपाशी पोटी ठेवून तुझ्या भावाकडून घर बांधकामासाठी पाच लाख रुपये आन या साठी वारंवार त्रास दिला अशा प्रकारची तक्रार दिल्यानंतर भोकर पोलिसांनी पीडीतेची तक्रार दाखल करून घेत सासरवाडीच्या मंडळी विरुद्ध 498(अ) ,323, 504,506,34अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका नामदेव जाधव हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी