पेठवडज येथील परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम -NNL

नऊ विद्यार्थी नवोदयसाठी पात्र 


उस्माननगर, माणिक भिसे। 
परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूल पेठवडज या शाळेतील यशाची परंपरा कायम ठेवत  यंदाही ह्या वर्षी एकुण नऊ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत या शाळेतील नवोदय विद्यालय साठी 66विद्यार्थीची निवड झाले असून या शाळेने पुन्हा एकदा उत्तंग भरारी घेतली आहे.

नवोदय मध्ये आजपर्यंत या शाळेतील 66 विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यापैकी इयत्ता 5 वी चे 8 व 9 वी चा 1 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.5 वी वर्गाचे  पहिल्या यादीत 5 तर दुसऱ्या यादी मध्ये 3 विद्यार्थ्यांची निवड  सक्षम दिनबंधु बनसोडे ,बोडलवार साईप्रसाद रमेश ,शिंदे अथर्व गोविंद असून यावर्षी शिष्यवृत्तीचाही निकाल शंभर टक्के लागला आहे.

इयता 5 वी चे 43 पैकी 43 विद्यार्थी पात्र व इयता 8 वी चे 11 पैकी 11 एकुण 54 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. आतापर्यंत शिष्यवृत्तीधारक 142 विद्यार्थी झाले आहेत तर सैनिक स्कूल साठी 21विद्यार्थी ची निवड झाली आहे. या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष गिरीधारी केंद्रे संस्थेचे सचिव गोविंद केंद्रे यांचा मोलाचे मार्गदर्शन लाभले होते तसेच पेठवडज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी येरमे केंद्रप्रमुख मोरे वीरभद्र जाधव तसेच परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा पवार. रेखाताई पोतदार. मुरली प्रसाद वैद्य. अशोक तेलंग राहुल किनवाड. सुनील पाटील चुटकुलवार एस डी. मनोहर लोहबंदे सर .राचेवाड कोमल सूर्यवंशी सर. आगलावे मिस. लक्ष्मी मिस. पवार सर. बोतेवाड मॅडम. पारडे वैशाली. गजभारे मिस .भगवान शिंदे. दीक्षित मिस. तेलंग मॅडम . सोनकांबळे मिस. वैद्य मिस. सोनाली करेवाड कपाळे सर .कुठेकर मॅडम. पाटील मॅडम. शेख नाझिया येरावार मिस. इंगोले मिस. लष्करे सर .करेवाड दैवशाला .भास्कर पवळे .कोमल हिवराळे .यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले होते यावेळी विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी