शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन -NNL

महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती करावी -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण


नांदेड।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना तातडीने पदावरून हटवत  महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता आयटीआय कॉर्नर भागातील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी या  भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध व जाेडेमाराे आंदाेलन, तसेच महाराष्ट्राची कन्या श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आराेपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी धरणे आंदाेल आयोजन केले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. माेहनअण्णा हंबर्डे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा ,ॲड.सुरेंद्र घोडजकर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर,माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले ,माजी महापौर जयश्री पावडे ,जि.प. चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर ,मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी , विरेंद्रसिंग गाडीवाले, अनुजा तेहरा, शमीम अब्दुला, विजय येवनकर, शाम दरक  आदींची प्रमुख उपस्थिती
   

यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की ,संवैधानिक व उच्च पद्स्थतांनी आपल्या पदाचा नावलौकिक राखावा मात्र वारंवार चुकीची विधाने करून  राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा नावलौकिक धुळीस मिळवला आहे . छत्रपती शिवाजी महाराज राज्याचेच नाही तर देशाचे दैवत आहेत.त्यांच्या वक्तव्याने देशाच्या अस्मितेला धक्का बसला . जण भावनेचा आदर करत केंद्र सरकारने त्यांना अन्य राज्यात पाठवून महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. या समवेतच महिलांच्या न्याय व सुरक्षतेचा मुद्दा उपस्थित करत दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला खटला जलदगती न्यायालयात चालवत आरोपीस फाशी देण्याची त्यांनी केली आहे. यावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी ही शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध  केला. यावेळी काँग्रेसच्या संतप्त आंदोलकांनी विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या प्रतिमेस जोड्याने मारत  निषेध व्यक्त केला.

  

आंदोलनात  निलेश पावडे, संजय लहानकर, मंगेश कदम, बालाजी गव्हाणे, बालाजी पांडागळे, रंगनाथ भुजबळ, अनंत तुपदाळे, आनंदराव भंडारे, किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, श्रीनिवास मोरे,  विलास धबाले, किशोर भवरे, अब्दुल गफार, अ.सत्तार, सतिष देशमुख तरोडेकर, आनंद चव्हाण,  कविताताई कळसकर, डॉ.निशा  निखाते, भानुसिंग रावत,  मुन्तजिबोद्दीन ,संजय पांपटवार, विठ्ठल पा.डक, संजय इंगेवाड, सुभाष पाटील, मुन्ना आबास, लक्ष्मीकांत गोणे, प्रशांत तिडके, संघरत्न कांबळे, अविनाश कदम, नागनाथ गड्म, राजू काळे, दिपक काळे, दिपक मोरतळे,किशन कल्याकर,अब्दुल फईम, महेंद्र पिंपळे, भि.ना.गायकवाड, सुभाष रायबोले, अ.रशीद अ.गणी, शिल्पा नरवाडे, सुखविंदरसिंघ   हुंदल, प्रफुल सावंत, अ. लतिफ, बालाजी चव्हाण, किशोर देशमुख, सतिष बसवदे, नामदेव आईलवाड, नवल पोकर्णा, बालाजी मदेवाड, अख्तर उल्लाबेग मिर्झा,  भास्कर पा. जोमेगावकर, व्यंकटेश शेटे, माधव कदम, अनिताताई हिंगोले, सुमती व्याहाळकर , डॉ.रेखाताई पाटील, लक्ष्मण जाधव, अतूल पेद्देवाड, व्यंकट मुदीराज, शिवाजी पवार, बालाजी पा.मिरकुटे, 

तिरुपती पा.कोंढेकर, विठ्ठल पावडे, विक्की  राऊतखेडकर,शंकर बाजीराव शिंदे,शशीकांत क्षीरसागर, आनंदराव गुंडले, गंगाधर सोंडारे, विजय देवडे, अनिल कांबळे, दादाराव बुक्तरे, गंगाप्रसाद कानडे, दिपक पाटील, शाम कोकाटे, अलिमखान ,नुरुल्ला खान, नरेंद्रसिंग गाडीवाले, जगदिश शहाणे, सय्यद शेरअल्ली,मोहमद नासिर, सुरेश हाटकर, श्रीरंग धनगे, धीरज यादव, अमित मुथा, प्रकाशकौर खालसा, सिध्दार्थ गायकवाड,संदिप सोनकांबळे, राऊत अर्धापूर, मुस्तबीर खतिब, उत्तम महाबळे, शरफोद्दीन शेख, देवराव पांडागळे, किरण इंगोले, अनिल गायकवाड , राजेश्‍वर पावडे, शाहीर जमदाडे, सुभाष काटकळंबे, जयश्रीताई राठोड, अरुणा पुरी,  नाजामा खान, इंजि. नसीमा जावेद ,पठाण, राजू लांडगे, चौधरी निखिल, सत्यपाल सावंत, दत्तू देशमुख, संजय मोरे, पुनिता रावत, नागोराव खानसोळे,प्रणिता भरणे, सुषमा थोरात, संजय गायकवाड, आनंदा गायकवाड, शिवराज कांबळे, रजिया बेगम, शाहीन रमजानी, आकेमवाड भूमन्ना, यादव रुपेश, देशमुख शिवाजीराव बरबडेकर, शेख रिहान, कामाजी आटकोरे, प्रा.गंगाधर सोनकांबळे,   दादाराव पुयड, उमेश पवळे,संजय पा. बोमनाळीकर , प्रल्हाद सोळंके,पार्वेकर किशोर, अमोल डोंगरे, अजिम शेख, हनमंत मालेगावकर, पदमावती झंपलवाड,  किशनराव रावणगावकर,देविदास माने, काशिनाथ गरड,नूर मोहम्मद,दिगंबर भोळे, युसूफ मिया,पंढरीनाथ मोटरगे, अक्षय मुपडे, सौ.सुनिता राठोड, सौ.सविता चव्हाणसह काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी