ईसापुर धरणातून बारमाही पाणी सोडून पैनगंगा नदी पात्रास तिसरा कालवा घोषित करा -NNL

नागोराव शिंदे यांचि जलसंपदा मंत्री यांच्या कडे मागणी


हिमायतनगर, चांदराव वानखेडे।
तालुक्यातून वाहणाऱ्या ईसापुर धारणा वरील पैनगंगा नदी पात्रामध्ये बारमाही पाणी सोडून पैनगंगा नदी पात्रास तिसरा कालवा घोषित करण्यासाठी आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष  तथा ग्रामीण पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष नागोराव संभाजी शिंदे यांनी हिमायतनगर तहसीलदार  डी एन गायकवाड यांच्या मार्फत  एक लेखी निवेदन देऊन मागणी केली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील दोन वर्षांपूर्वी या भागातील असंख्य शेतकऱ्यांनी ईसापुर धरणामध्ये साखळी पद्धतीने आंदोलन व उपोषण करून प्रशासनास जागे करण्यासाठी व पैनगंगा नदी पात्रामध्ये बारमाही पाणी सोडण्यासाठी एक मोठे धरणे आंदोलन केले होते तेव्हा प्रशासनास ह्याची जाग आली होती./पण त्यानंतर प्रशासनाने या धरणाकडे दुर्लक्ष केल्याने आता येथील शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनचे जिल्हाध्यक्ष नागोराव शिंदे यांच्यासह त्यांच्या शिष्ट मंडळांनी आज महाराष्ट्राचे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक लेखी निवेदन देऊन हिमायतनगर तालुक्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदी पात्रामध्ये बारमाही पाणी सोडण्याची व्यवस्था करावी व ईसापुर धरणातून जाणाऱ्या पैनगंगा नदी पात्रास तिसरा कालवा घोषित करावा अशी मागणी केली आहे.

विदर्भातील उमरखेड आणि मराठवाड्यातील हदगाव हिमायतनगर ,किनवट माहूर असे अंदाजे  चार ते पाच तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटेल त्यामुळे येथील पाण्याची सुद्धा टंचाई दूर होईल व येथील शेतकरी सुजलाम सुफलाम होतील यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील ,हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व हिमायतनगर तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. यावेळी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनचे जिल्हाध्यक्ष नागोराव शिंदे , चांदराव वानखेडे अणिल भौरे ,कानबा पोपलवार नागेश शिंदे विजय वाठोरे गायकवाड दिघिकर  संजय वाडेकर, सचिन जाधव सुकवास बेंद्रे सह अनेकजण उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी