परभणीत लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा संमत होण्यासाठी हिंदुधर्म रक्षण मूक मोर्चा सपन्न -NNL

हिंदुधरमीय बंधुभगिणी यांचा आलोट जनसागर


परभणी।
परभणी येथे हिंदुधर्म प्रतिष्ठान यांचे वतीने लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा. या मागणीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी शनिवार बाजार परभणी येथून हिंदुधर्म रक्षण मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.


मोर्चाची सुरुवात संत महंत यांचे हस्ते भगवा ध्वजास पुष्पहार अर्पण करून व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली त्यांनतर ध्येयमंत्र म्हणून करण्यात आली.


सदरील मूक मोर्चा नानालपेठ मार्गे शिवाजी चौक गुजरी बाजार गांधी पार्क नारायण चाळ विसावा चौक करत श्री पेढा हनुमान मंदिर मैदानात पोहचली येथे मोर्चाचे उद्दिष्ट व निवेदनाचे वाचन करण्यात आले तसेच लव्ह जिहाद मधील बळी पडलेल्या मृत युवतींना श्रद्धांजली वाहिली गेली.


तसेच लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा जर त्वरित सममत न झाल्यास येत्या 20 डिसेंबर पासून मुंबई आझाद मैदानात आमरण उपोषण प्रारंभ करण्यात येईल असा इशारा शासनास यावेळी देण्यात आला. अशा प्रकारचे मूक मोर्चे आजपासून महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यात काढण्यात येतील असेही कळवले गेले आहे. या मूक मोर्चा मध्ये महिला युवती पुरुष ज्येष्ठ नागरिक लहान मुले विविध क्षेत्रातील नागरिक व्यावसायिक उद्योजक राजकीय पक्षाचे नेते आमदार नगरसेवक यांचा जनसागर उसळून आला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी