विष्णुपुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा निमित्ताने अंखड हारिनाम सप्ताह आयोजन -NNL


नविन नांदेड।
विष्णुपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा निमित्ताने भागवत कथा,लक्षमण शक्ती अखंड हारिनाम सप्ताह दि.16ते 23 दरम्यान आयोजित करण्यात आला असून दैनंदिन काकडा आरती, ज्ञानेशवर पारायण,गाथा भजन, रामायण वाचन,भागवत कथा,हारीपाठ व हारि किर्तन मुख्य हनुमान मंदिर खालची गल्ली हनुमान मंदिर विष्णुपुरी ता.जि.नांदेड आयोजित केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कै.मामासाहेब मारतळेकर महाराज,श्री रामजी ठाकूर महाराज, पुजारी डॉ.हरजितेद्र बाबाजी,बाबजी दसमेस गुरूद्वारा विष्णुपुरी,वंसत कुलकर्णी मुख्य पुजारी, यांच्या आशीर्वादाने विष्णुपुरी येथे दि.16ते 23 नोव्हेंबर पर्यंत अखंड हारिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्ती कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथाकार हभप दिपक गुरू महाराज जोशी ठोणपांगरेकर यांच्यी भागवत कथा 15  ते 21 नोव्हेंबर दुपारी 2ते 5 व दैनंदिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानेशवरी पारायण प्रमुख व्यासपीठ कोंडीबा मोरे टेळकीकर, लक्षमण शक्ती प्रमुख हभप भाऊसाहेब नरहारी पावडे,लक्षमण शक्ती समारोप आरती प्रमुख लक्ष्मण लिंबाजी ठाकूर पुजारी हनुमान मंदिर देवस्थान यांच्या हस्ते होणार आहे तर  या अखंड हारिनाम सप्ताह मध्ये हभप राम महाराज भारसावडे, लक्ष्मण महाराज बोरगडीकर, हभप परमेश्वर गुरूजी कंधारकर,हभप नंदकिशोर महाराज, हभप बालाजी महाराज गुंडेगाव,हभप भाऊसाहेब  नरहारी महाराज पावडेवाडीकर, यांच्या किर्तन आयोजित करण्यात आले आहे.

 हभप मधुसूदन महाराज कापसीकर यांच्ये काल्याचे किर्तन 23रोजी सकाळी 9ते 11व नंतर अखंड हारिनाम सप्ताह व 22रोजी ज्ञानेशवरी पालखी सोहळा मिरवणुक काढण्यात येईल व सकाळी गुलालचे किर्तन हभप बापुराव महाराज सोनखेडकर यांच्या होईल व महाप्रसाद सुरू होईल व रात्री हभप सौ.मैनाताई दिपनाळीकर यांच्ये किर्तन होईल,या अखंड हारिनाम सप्ताह सोहळ्याला भाविक भक्तांची ऊपसिथीत राहण्याचे आवाहन आ.मोहनराव हंबर्डे व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी