शिवणीत विधवा अंगणवाडी सेविकेचा विनयभंग; आरोपीच्या विरोधात ईस्लापुर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल-NNL


शिवणी,प्रकाश कार्लेवाड।
किनवट तालुक्यातील शिवणी येथील संजय वाठोरे वय ४० ह्याने घराजवळील एक अंगणवाडी सेविकेला मागील अनेक दिवसांपासून सतत पाठलाग करणे, रस्त्याने जाताना दुचाकीने कट मारणे व पोषण आहार वाटप करतांना अंगणवाडीत जाऊन शिवीगाळ करत धमकावणे मानसिक त्रास देणे,सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, ह्या जाचाला कंटाळून अखेर अंगणवाडी सेविकेने काल दि.१९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी इस्लापुर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली.

याबाबत दिलेल्या तक्रारीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांना मागील घडलेल्या सर्व आप बिती सांगितली. यावरून पोलिसांनी सदरील व्यक्ती संजय वाठोरे ह्याच्यावर भा.दं.वी. ३५४ (अ) ३५४ (ड) ५०४,५०६ या नुसार  विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे शिवणी येथील अंगणवाडी सेविका दररोजच्या नियमाप्रमाणे दि.१९ नोव्हेंबर रोजी सकाळी अंगणवाडीत बालकांना पोषण आहार वाटप करत असतांना त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी संजय वाठोरे यांच्या पत्नीने आपल्या बळाला अंगणवाडीच्या वर्गामध्ये आणून सोडले.

 तेंव्हा तो लहान मुलगा सतत रडत होता, आणि वर्गात बसण्यास नकार देत होता. त्यामुळे बालकास त्याच्या आईने परत आपल्या घरी घेऊन गेली. थोड्या वेळाने त्या बालकास त्याचे वडील संजय वाठोरे ह्याने घेऊन येऊन वर्गात बसवून अंगणवाडी सेविकेस भांडण व तंटा करून गलिच्छ भाषेचे वापर करून शिवीगाळ केली. बाळास परत घेऊन गेला थोड्या वेळाने अंगणवाडी बंद करत असतांना परत येऊन माझा मोबाईल नंबर मागू लागला व वाईट उद्देशाने माझ्या अंगावर आला. आणि कोणाला सांगल्यास मी पत्रकार आहे तुझ्या विरोधात बातमी लावून तुला बदनाम करिन असे धमकी देऊ लागला व अश्लील चाळे करू लागला. तेंव्हा मी तिथुन कसे बसे पळ काढत घरी गेले.सदरील आरोपी मागील अनेक दिवसांपासून माझा पाठलाग करत असतो. सतत माझ्या घराजवळ येऊन स्कुटीचे हॉर्न वाजवत असतो. मी माझे काम करून घराकडे चलत जाताना रस्त्यावर स्कुटीने कट मारतो. तर कधी कधी स्कुटी अचानक (दुचाकी वाहन) अंगावर आणतो, सदरील इसम हा गुंड व गुन्हेगारी वृत्तीचा असल्या कारणाने व पुढे माझ्या सोबत यापेक्षाही काही घडू नये यासाठी दि.१९ रोजी मी एकटी असल्या कारणाने अंगणवाडीत येऊन अशा प्रकारे अश्लील चाळे करत माझ्या अंगावर आल्याने मी माझ्या भावाला सोबत घेऊन पोलीस स्टेशन येथे न्याय मागण्यासाठी आले असे तक्रारीत नमूद केले आहे.

या अनुषंगाने सदरील आरोपी संजय वाठोरे ह्याच्या इस्लापुर पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे पुढील तपास सपोनि रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि भारत सावंत व पोलीस अमलदार सावळे हे करीत आहेत. करीता या प्रकरणात आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी