किळसवाण्या गटबाजीमुळे अनेक पक्ष संघटना संपल्या; खोके,बोके,धोके आणि ओके हे सोईनुसार वापरण्यात येणारे विशेषणे -NNL


चंगळवादाची भुरळ पडली की, माणूस नाईलाजाने नाहीतर आपल्या बुद्धीचातुर्याने तडजोड करीत असतो.मग त्यामध्ये मानसन्मान, स्वाभिमान आणि सोईस्कर पद्धतीने आपली औकात हळूहळू विसरतो.

तेव्हा त्याचे तत्वज्ञान आणि  विश्वासार्हता  निवडक आणि त्याच्या प्याद्यापर्यंतच मर्यादित रहाते परंतु त्यास हे समजत नाही आणि त्याची भक्त म्हणून वावरणारी मंडळी चूक लक्षात आणून न देता समर्थनच करीत रहातात.त्याचे कारण म्हणजे चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला तर आपली दुकानदारी बंद पडेल ही मनोमन त्यांच्या मनात भीती असते.

अगदी क्रांतिकारी बदलासाठी ताऊन सुलाखून चळवळीत आलेले,कालांतराने प्रमुख असलेला मुखीया एवढा मुजोर आणि कठोर होतो,त्यास त्याने घेतलेले निर्णय आणि लादलेली प्रक्रिया योग्य आणि अचूक आहे असे वाटते.त्याच्या डोक्यात नोकर्षाहीने शिरकाव केलेला असतो.

अंतर्गत हिसेवाटणी आणि  केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने काही त्यापैकीच बंड करीत आहोत असा आव आणून आपला वेगळा गट बांधणीसाठी आपले बुद्धीकौशल्य वापरून हेकेखोर आणि समान हिस्सा देत नसलेल्या आपल्याच जवळच्या नेतृत्वा विरुद्ध आवाज उठवून काही जणांना सोबत घेऊन आपला वेगळा गट तयार करतात.

ही परंपरा अनेक दशके आणि शतकांपासून सुरु आहे.बदल घडवून आणण्यासाठी व सर्व सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या लोकशाहीवादी पक्ष संघटना मध्ये देखील ह्या पिकास सुपीक जमीन तयार करण्यात आलेली आहे.काही अपवाद असतीलही परंतु अत्यंतबुद्धिमत्ता असल्याचा आव आणणारे, व्यक्तीगत संपती साठवून त्या मध्ये वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करणारे, क्रांतिकारी शब्दाचा वापर जास्त वेळा करणारे, आपले योगदान जास्त कसे आहे हे जाणीव करून देणारे,स्वतःचा गट तयार करून आपल्या गटाचे वर्चस्व कसे सिद्ध करता येईल यासाठी  बुद्यांकाचा वापर करणारे परंतु आमच्याकडे सर्व काही ओके आहे म्हणणारे पक्ष विरोधी कारवाईला सुरवात करीत असतात.म्हणूच अंतर्गत गट बाजी आसले पक्ष निवडणुकीत प्रभावला सामोरे जात आहेत.

छोट्या छोट्या वसुली पथका मार्फत वसूल केलेली रक्कम देखील हळू हळू त्यांना खोट्या प्रतिष्ठे पर्यंत घेऊन जाते,मात्र ज्या उद्देशाने ते पक्षात आलेले असतात ते सर्व रसातळला जाते.खोटी प्रतिष्ठा आणि आलेला उन्माद शेवटी गद्दारी व मनोबल खचवीणारा ठरतो.

बदल घडविण्याची मानसिक तयारी करून आलेल्या काही व्यक्ती एवढ्या व्यक्तीवादी होतात की त्यांच्यासाठी समाज आणि आपले परके ओळखण्याची क्षमताही शिल्लक रहात नाही.

ध्येय बदलले की व्यक्ती पैसा आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी धडपड करीत असतो.खोट्या प्रतिष्ठेचा बागुलबुवा त्यास शांत बसू देत नाही.खोके,बोके,धोके आणि ओके हे विशेषणे स्वतःला काळजीवाहू समजणारे देखील आपल्या सोयीनुसारच वापरतात.

आमच्याही.....नाथानी सोडली साथ,,, वेगळीच त्यांची बात, घडले सर्व हे इथे,,,, केवळ लेवी पाई....   क्रमशः

कॉ. गंगाधर गायकवाड,नांदेड. जनरल सेक्रेटरी सीटू नांदेड जिल्हा कमिटी.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी