मूर्ती घडवणारी व्यक्ती विशेष असते- शामराव इनामदार -NNL


नांदेड।
सर्वजण मूर्तीची तारीफ करतात मूर्ती घडवणारा त्यापेक्षा विशेष असतो अशीच संघर्षाची धाडसाची मूर्ती घडवणारी माता भाग्यरथीबाई मुंडकर या खऱ्या अर्थाने वीर माता आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक श्यामराव इनामदार यांनी केले. ते इच्छापूर्ती हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, सेवानिवृत्त शिक्षक एल एस देशमुख आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले की, माझ्या मातेसमान असलेल्या श्रीमती मुंडकर यांनी,पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट परिस्थिती असताना संघर्षमय जीवनात खचून न जाता मुलांना परावलंबी न बनवता, स्वावलंबनाचे शिक्षण देत असतानाच देशसेवा आणि समाजसेवेचे धडे दिले. त्यामुळे केंद्रीय पोलीस दलातील शंकरराव,  मुंडकर , समाजसेवेतील गोविंदराव मुंडकर सारखे व्यक्ती समाजाला लाभले.

परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट संवादाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ऐश्वर्या मुंडकर यांनी कैलासवाशी शेषराव मुंडकर यांचे स्मरण करून आपल्या भाषणात म्हणाले की,  जवान आणि किसान माझ्या कुटुंबात घडले याचा सार्थ अभिमान वाटतो. देशाला जवान आणि किसान यांची  गरज असल्याचे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नमूद केले होते. 

ते भागवतबाई मुंडकर यांनी कठीण आणि संघर्षमय परिस्थितीतही घडवले. यावेळी एल एस देशमुख श्री यादवराव तुडमे, श्री पटाईत  आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी विशोक चंचलवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्या होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी