भोकरमध्ये युवक-युवतीचा रेल्वे खाली आल्याने मृत्यु-NNL

भोकरमध्ये प्रेमयुगलांचा रेल्वेसमोर उडी घेऊन करुण अंत


भोकर, गंगाधर पडवळे| इंस्टग्राम, फेसबुक आदी माध्यमानंवर कपलं फोटो शेअर करीत अखेर भोकरमध्ये प्रेमियुगलांनी  भोकर शहरातील रेल्वे उड्डाणं पुलाजवळ आदिलाबाद -मुंबई जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार घटनेची सविस्तर माहिती अशी की दि.११नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.३० वाजण्याचे दरम्यान युवक शिवराज मनोज क्यातमवार (२१) रा. कासार गल्ली गांधी चौक भोकर व युवती कु.धारा माधव मोरे (१९)  रा. रिठ्ठा तालुका भोकर या प्रेमयुगलाने आदिलाबाद - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस भोकर शहरातील उड्डाणं पुलाजवळ येताच धावत्या रेल्वे इंजिन समोर जाऊन उडी मारली यामुळे दोघांचाही यात दुर्दैव मृत्यू झाला. याप्रेमीयुगलाचे गेल्या काही दिवसापासून प्रेम संबंध होते.मयत युवती आय. टी. आय. उत्तीर्ण झाल्या नंतर एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती तर मयत युवक भोकर येथील एका महाविद्यालयात बी. कॉम तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. 


मयत युवतीचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना एक मुलगा व चार मुली आहेत त्यापैकी ही एक होती तर मयत युवकांच्या वडिलांचे शहरात लेडीज एम्पोरीयम व बांगडयाचे दुकान आहे. कुटूंबात तो एकुलता एक मुलगा होता व दोन बहिणी पैकी एकीचे नुकतेच लग्न झाले आहे. सदरील बांगड्याच्या दुकानात तो मदत करायचा याच दरम्यान सदरील युवतीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते परंतु त्यांच्या प्रेमसंबधा विषयी दोघांच्याही कुटुंबीयांना कसल्याच प्रकारची माहिती नव्हती असे समजले अशी असताना या दोघांनी अशा प्रकारे आपल्या जीवनाचा अंत करण्याचा निर्णय का घेतला?  यावर प्रश्न चिन्ह आहे.  


हृदय हेलावून टाकणारी सदरील घटना ही भोकर शहरातील मध्यवर्ती स्थानी, वर्दळीच्या ठिकाणी झाल्याने मयत प्रेमियुगालाचे मृतदेह पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, राणी भोंडवे, अनिल कांबळे, पोहेका नामदेव जाधव, नामदेव शिरोळे, विकास राठोड, पो.ना.प्रकाश वावळे आदींनी मोठ्या शर्थिचे प्रयत्न करून बघ्यांची गर्दी पांगविली.

तसेच रेल्वे पोलिसांना या घटणेबाबत माहिती दिल्यावरून रेल्वे पो. नी. सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपी,पोलीस नाईक अनंता आघाव,पो.का.संदीप पोपलवार,पो. का. दत्ता मुंगल,आदीं घटनास्थळी दाखल झाले व रीतसर  पंचनामा करुन भोकर येथील जुनेद पटेल, बालाजी काळे आदी युवकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह  उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आले. प्रेमि युगलांचा या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अनंता आढाव हे करीत आहेत. या प्रेमी युगालाने अशा प्रकारे आपल्या जीवनाचा दुर्दैवी अंत करून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी