‘स्वारातीम’ विद्यापीठ सिनेट निवडणूक पदवीधर गटासाठीचा निकाल जाहीर -NNL


नांदेड।
पदवीधर गटासाठीची मतमोजणी प्रक्रिया दि. १६ नोव्हेंबर रोजी स. १०:०० वा. चालू करण्यात आली होती. प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात संध्याकाळी ०५:०० वा. झाली. अनेक फेऱ्यानंतर सर्व निकाल दि. १७ नोव्हेंबर रोजी स.०५:०० वा. घोषित करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नोंदणीकृत पदवीधर गटामधून अधिसभेवर १० प्रतिनिधी निवडून देण्यासाठी दि. १३ नोव्हेंबर रोजी स. ०८:०० ते ०५:०० वा. दरम्यान परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १०९४४ मतदारांपैकी ५७८४ मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 

खुल्या गटामधून एकूण ५ जागेसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी नारायण चौधरी, विक्रम पतंगे, युवराज पाटील, विनोद माने व महेश मगर हे निवडून आले. अनुसूचित जाती प्रवर्गामधून १ जागेसाठी एकूण ३ उमेदवार रिंगणामध्ये होते. त्यामधून अजय गायकवाड हे विजयी झाले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते. त्यामधून आकाश रेजितवाड यांना विजयी घोषित करण्यात आले.विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गामधून १ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये गजानन आसोलेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. इतर मागास प्रवर्गातून १ जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये हणमंत कंधारकर यांना विजयी घोषित करण्यात आले. महिला प्रवर्गामधून १जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये शितल सोनटक्के यांना विजयी घोषित करण्यात आले. 

सदर निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे, विशेष कार्य अधिकारी मेजर शांतीनाथ बनसोडे,उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, महेश त्रिभुवन,सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड, उपवित्त व लेखा अधिकारी मोहम्मद शकील, सहा. कुलसचिव पी.ए. कुलकर्णी यांच्यासह शिक्षक,अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी