विवेकानंद केंद्राच्या कार्याचा विस्तार व्हावा : चंद्रकांत पाटील - NNL

विवेक बोधिनी, विवेक रत्नाकरचेप्रकाशन 


पुणे|
'विवेक शलाका  २०२३ (दिनबोधिनी-डायरी), विवेक रत्नाकर २०२३(कार्य दर्शिका-कॅलेंडर) ' चे   प्रकाशन  शनीवार ,दि. १९ नोव्हेंबर रोजी   पुण्यात  झाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,रामकृष्ण मठ(पुणे)चे अध्यक्ष श्रीकांतानंद महाराज,'आपलं घर' संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

हा कार्यक्रम ज्योत्स्ना भोळे सभागृह(हिराबाग ) येथे सायंकाळी ६ वाजता झाला. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट यांनी स्वागत केले. दिलीप महाजन, वसुधा करंदीकर , शैलेंद्र बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


चंद्रकांत पाटील म्हणाले, ' डायरीच्या, कॅलेंडरमधून विवेकानंद यांचे विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.ग्रंथालयांमधून हे विचार पोहोचविण्यासाठी शासन  मदत करेल. १ हजार युवक विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून सेवाव्रती म्हणून कार्यरत होत असताना आम्ही मदत करू. विवेकानंद केंद्राच्या कार्याचा मोठा आणि चांगला  परिणाम झाला आहे. मिशनरी प्रयत्नांना शाळा, रूग्णालये, अनाथालये चालवून विवेकानंद केंद्राने उत्तर दिले.आक्रमकांनी प्रयत्न करुनही हिंदू धर्म कमी झालेला नाही.पूर्णवेळ काम केल्याने कोणत्याही क्षेत्रात त्या कार्यकर्त्याचे काम उठावदार होते. विवेकानंद केंद्राच्या कार्याचा विस्तार झाला पाहिजे.

'विवेक रत्नाकर 'या कॅलेंडरचा विषय स्वामी विवेकानंद जन्मापासून निधनापर्यंत देशात जिथे राहिले अशा सहा वास्तूंवर, तिथे उभारण्यात आलेल्या स्मारकांवर आधारित आहे. श्रीकांतानंद हाच धागा पकडून विवेकानंदांच्या तेव्हाच्या महाराष्ट्रातील प्रवासावर भाष्य केले.  हिराबागेत स्वामी विवेकानंद आले होते.प्रकाशन कार्यक्रम इथेच होतो आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.

१९ नोव्हेंबर हा दिवस एकनाथजी रानडे यांचा जन्मदिवस असल्याने याच दिवशी प्रकाशन समारंभ करण्यात आला. स्वामी श्रीकांतानंद म्हणाले,' विवेकानंद यांचा कर्मयोग घेऊन कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक उभे राहिले.विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचा प्रसार होत आहे.

त्यातून जागृती निर्माण झाली. सनातन धर्माचा प्रचार जगभर करणे, हेच त्यांचे उद्दीष्ट होते. जगात भौतिक वाद वाढला असताना भारतीय वेदांत विचार जगाला दिले. धर्माची खरी तत्वे, अध्यात्म जगाला देण्याची गरज आहे. नैतिकता असेल तरच अध्यात्मिकता निर्माण होते. चारित्र्यवान मनुष्यबळ निर्माण झाले तरच देश बळकट होऊ शकतो '.  'विजय फळणीकर म्हणाले, 'निरपेक्ष भावनेने काम केले तर सेवाकार्य वाढते. दानशूर मंडळींचे योगदान समाजकार्यात महत्वाचे आहे. परदेशात राहणारे भारतीय युवक प्रत्यक्ष कामाचे योगदान देतात हेही महत्वाचे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी