वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षपदी चेअरमन सविता गायकवाड सोनखेडकर यांची निवड -NNL


लोहा।
वस्त्र उद्योग महासंघाच्या उपाध्यक्षपदी  महाकाली सुतगिरणीच्या चेअरमन श्रीमती सविता विठ्ठलराव गायकवाड सोनखेडकर यांची निवड करण्यात आली आहे.

सहकारी सूत गिरण्या व वस्त्रोद्योग सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या कार्यकारणी जाहीर झाली. माजी आमदार विठ्ठलराव गायकवाड यांच्या पत्नी   चेअरमन सविता  गायकवाड सोनखेडकर यांची निवड झाली आहे. राज्य पातळीवर या  निमित्ताने कार्य करण्याची संधी त्यांना  मिळाली आहे.

मुंबई येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे सहकारी संस्थेचे उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासंघाचे संचालक  मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी अशोक स्वामी, तर उपाध्यक्षपदी सविता सोनखेडकर यांची एकमताने निवड झाली. बाबाराव पाटील, अशोकराव माने, राहुल महाडिक, विरेंद्र गजभिये, चंद्रकांत बडवे, विश्वनाथ मेटे, सुनील तोडकर, दिलीप मुथा, हे उपस्थित होते.

या दोघांचे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले. निवडीनंतर आभार व्यक्त करत स्वामी व सविता गायकवाड सोनखेडकर यांनी राज्यातील सहकारी सूतगिरण्या ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी व उभारणीखालील गिरण्या लवकर उत्पादनाखाली आणण्यासाठी तसेच यंत्रमाग, गारमेंटसह इतर सर्व वस्त्रोद्यग प्रयत्न करेल

स्वामी हे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यंकटेश शेतकरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन, तर सोनखेडकर या नांदेड जिल्ह्यातील माता महाकाली महिला मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी स्वामी यांचे, तर सोनखेडकर यांचे नाव वस्त्र उद्योगाच्या विकासासाठी बाबाराव पाटील यांनी सुचविले. वस्त्रउद्योग मंत्री पाटील यांनी या निवडी  केल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी