सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी -NNL


नवीन नांदेड।
सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या इतिहासात एक स्फूर्तीदायक, कणखर, निडर, व्यक्तीमत्त्व व आर्यन लेडी म्हणून ओळखले जाणाऱ्या भारताच्या पहिल्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंती आज आज दिनांक १९.११.२०२२ रोजी डॉ. शंकररावजी चव्हाण सभागृह सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी सम्पर्क कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा तथा माजी नगरसेविका प्रा.डॉ. ललिता शिंदे बोकारे हया होत्या तर व्यासपीठावर सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, जेष्ठ काँग्रेस नेते डॉ. अशोक कलंत्री, भि.ना. गायकवाड, सौ.निता काकडे, सौ. सुलोचना बेळीकर,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे म्हणाले की स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे देशासाठी खूप मोठे महान योगदान राहिलेलं आहे. आणि अशा भारताच्या महान थोर नेत्या स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या समवेत आपले श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांनी कार्य केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि आज त्यांचे पुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव जी चव्हाण हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी व राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत ही आमच्यासाठी भूषणावह बाब आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेड जिल्ह्यात भूतो न भविष्य असं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल. खा. राहुल गांधी यांनी आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर कौतुकाची थाप मारली. याचा आम्हाला हृदयातून आनंद झाला.

आज स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. श्री. अशोकराव चव्हाण साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो अशी प्रास्ताविकात भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. अशोक कलंत्री, नामदेव पदमने यांनी देखिल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे यांनी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे बालपण, त्यांच्या पंतप्रधान काळातील कार्याचा आढावा घेऊन. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासात सर्व क्षेत्रात खूप मोठा मोलाचा वाटा उचलला होता. त्यांचे कार्य व विचार आधी भारतातील असंख्य महिलांना प्रेरणा देणारे आहेत अशी भावना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी व्यक्त केली व स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जीवन चरित्रावर विस्तृतपणे अभ्यासपूर्ण भूमिका विशद केली.

यावेळी विश्वनाथ शिंदे, पंढरीनाथ रोडे, काशिनाथ गरड, प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, राजू लांडगे,किशनराव रावणगावकर, वैजनाथ माने, शेख नुरोद्दीन, शंकरराव धिरडीकर, संजय कदम, प्रा. अशोक गोणारकर, प्रा. गजानन मोरे, संतोष कांचनगिरे, भुजंग स्वामी, संगम कांचनगिरे, प्रभु उरुडवड, दिगंबर भोळे, आर्यन कांचनगिरे, वैभव रामगिरवार, सुशिलाबाई कुंचोलीकर, वंदना नाईक, सुनिता संगेवार, शमशाद बेगम पठाण, चैत्राबाई गायकवाड, कल्याणी ठाकूर, आशादेवी पाताळे, महानंदाताई, जयाबाई वाठोरे, विमलबाई चित्ते, चिमणाबाई कळसे, अनिता गजेवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती  आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शशीकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डॉ रमेश नांदेडकर यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी