थायलंडच्या धम्मसहलीहून परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा सत्कार -NNL


नांदेड।
बौद्ध राष्ट्र थायलंडहून‌ परतलेल्या येथील बौद्ध उपासक उपासिकांचा हृद्य सत्कार तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात करण्यात आला.  यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सुनंद यांच्यासह भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनिल थोरात, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. इंगोले, प्रा. विनायक लोणे, धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, प्रकाश ढवळे, अशोक मल्हारे, सुकेशिनी गायगोधने, निवृत्ती लोणे, नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती. 

कार्तिक पौर्णिमेनिमित्त खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महामानवांना अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. गेल्या महिन्यात बौद्ध राष्ट्र थायलंड येथे भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध उपासक उपासिकांचा एक चमू धम्म समजून घेण्यासाठी रवाना झाला होता. धम्मसहलीहून परतलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचा ऋषिपठण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात डॉ. विलास ढवळे, प्रमिला रायभोळे, शिवगंगा वाटोडे, सुमन वावळे, आशालता शिंदे, व्यंकट वावळे, निर्मला येंगडे, आशा जाधव, संजिवनी थोरात, सुमन गजभारे, सुनंदा गजभारे, विजय थोरात यांच्यासह ६८ जण  सहभागी झाले होते.

 कार्यक्रमादरम्यान बोधीपुजा, गाथा पठाण, ध्यानसाधना,  त्रिरत्न वंदना, धम्मदेसना, व्याख्यान, भोजनदान, आर्थिकदान, फलदान आदी कार्यक्रम संपन्न झाले. भिक्खू संघाकडून धम्मदीक्षा घेतलेल्या नवरखेले कुटुंबातील रवी नवरखेले, शुभांगी नवरखेले, नितेश नवरखेले, समीरण नवरखेले यांना धम्मदीक्षा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच वसमत येथे १० दिवस श्रामणेर दीक्षा घेऊन प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या पंचवीस बालकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात संपन्न झालेल्या पौर्णिमोत्सव कार्यक्रमासाठी नांदेड शहर, जिल्हा व सीमावर्ती जिल्ह्यांतन बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुरगाव नांदुसा परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी परिश्रम घेतले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी