आधिका-याना 'मोह' आवरेना; खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहण्याची फैशन -NNL


हदगाव, शे.चांदपाशा|
हदगाव शहरात व तालुक्यात महाराष्ट्र शासन लिहण्याचे 'फैशन 'दिसुन येत आहे. अशा वाहनावर राज्यपरिवहन आधिकारी कारवाई करित असताना दिसुन येत नाही. 

तालुक्यात विविध राज्याचे काही खाजगी कंञाटदार रोड सहीत विविध कामे करित आहे. या कामावर देखरेख करण्याच्या वाहनावर पण भारत सरकार, महाराष्ट्र शासन लिहल्याचे आढळून येत आहे. अश्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे असे आदेश परिवहन आयुक्ताचे आहे. पण त्यांच्या आदेशाची अमलबजाणी होतांना दिसुन येत नसल्याच दिसुन येत आहे. या आदेशात कोणी 'महाराष्ट्र शासन ' पाटी लावून कोणी मिरवत असेल तर अशा वाहनावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, ऐखाद्या खाजगी वाहनावर 'महाराष्ट्र शासन ' अशी पाटी दिसुन आल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाहनाची चौकशी करणार असल्याची माहीती मिळाली ते वाहन जप्त पण केले जाऊ शकते, अशी जर खाजगी वाहन शासकीय कार्यालय किवा अधिका-याने भाडेतत्वावर घेतले असल्यास त्यावर 'महाराष्ट्र शासन ' लावण्यास हरकत नाही, परंतु तो आधिकारी त्या वाहनातुन प्रवास करित असावे, या बाबतीत माञ परिवहन विभागाचे अधिकारी तालुकास्तरावर केव्हा येतात आले तर लगेच निघून जातात या मुळे माहीती मिळत नाही.

पोलिस पण ... काही पोलीस पण आपल्या खाजगी वाहनावर 'पोलीस ' पाटी लावतांना दिसुन येत आहे. या बाबतीत विशेष पोलिस महानिरक्षक नादेड यांनी वृतमानपञाच्या बातमी दखल घेत अश्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. माञ आश्या वाहनावर कारवाई झाली की.? नाही या बाबतीत माञ माहीती मीळु शकली नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी